Voice of Eastern
ताज्या बातम्या

करोना हृदय सम्राट”गप्प का? शिवसेनेच्या आंदोलनावरून मनसेची टीका

banner

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वरती आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मुंबईत भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते काही ठिकाणी आमने-सामने देखील आले होते. मात्र कोरोना काळात सुरू असलेल्या या आंदोलनावर मनसेने टीका केलेली आहे.करोना हृदय सम्राट”गप्प का? अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

आज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये कायदा सुव्यवस्था “फाट्यावर”मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून “करोना हृदय सम्राट”गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत अशी टीका महाराष्ट्र निर्माण सेना सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

काल गणेश उत्सव मंडळ आणि दहीहंडी उत्सव मंडळ यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची भीती आहे सांगत आहेत. याही वर्षी साधेपणाने गणेशोत्सव निर्बंध आता साजरे करू असा सांगितलं. यावर सण आले की फक्त कोरोना होतो अशी टीका करत सर्वसामान्यांनी नाराजी केली. सरकार सण उत्सव साजरे करायला कोरोनाच कारण देते मात्र आज शिवसैनिकांनी राज्यभर केलेल्या आंदोलनामुळे सर्वत्र गर्दी झाली, मग आता कोरोना पसरत नाही का असा सवाल सर्वसामान्यांसह विरोधी पक्ष विचारत आहेत.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती या बैठकीस राज यांनी या प्रकरणातबाबत नाराजी व्यक्त केली होती. जे काही सुरू आहे ते व्हायला नको होतं, चुकीच्या पद्धतीने सर्व काही होत आहे, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडल्याचे नांदगावकर यांनी सांगितले

Related posts

सैनिकाच्या जीवनातील कथांवर आधारित ‘वर्दी के वीर’ पहिला बॉलीवूड म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट जाहीर

Voice of Eastern

तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे बारावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा

सहा महिने झाले भरती चालू आहे इतकं गतिमान सरकार – अजित पवारांनी सरकारचे टोचले कान

Leave a Comment