- मुंबई
कोर्टाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश उत्सव हा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळ कडून मोठे देखावे सादर केले जातात यातून सामाजिक संदेश दिले जातात. मात्र यंदा मोठे देखावे मंडळाने साकारले नाही आहेत मात्र दुसरीकडे घरगुती गणपती च्या माध्यमातून काही गणेश भक्तांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सायन प्रतीक्षा नगर येथे राहणारे फ्रांकलिन पाॅल यांनी मुंबईची होणारी तू मुंबई या थीम वरती एक आगळी वेगळी कलाकृती उभारली आहे. या सजावटीच्या माध्यमातून विकासाच्या नावावर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास दाखवण्यात आला आहे.
मुंबईत पावसाळ्यात सखल भागात पाणी साचणं हे नेहमीच बघायला मिळत असते. अशातच सायन परिसरातील फ्रांकलिन पाॅल यानं एक घरगुती देखावा साकारला आहे. ज्यात हिंदमाता परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर जी परिस्थिती होते ती दाखवण्यात आली आहे. सोबतच बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीनं साकारण्यात आली आहे तर बाप्पा विराजमान असलेली लाकडी खोड देखील मातीनंच बनवली आहे.
मुंबईसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते आम्ही हा देखावा तयार केला आहे. दरवेळी पाऊस आला की स्थिती निर्माण करते आपल्याही डोक्यात हे रोजच आहे असं वाक्य तयार झाला आहे. त्यामुळे लोकांपर्यंत एक सामाजिक संदेश पोहोचविण्यासाठी आम्ही हा देखावा तयार केलेला आहे. या ठिकाणी आम्ही दादर हिंदमाता येथील दरवर्षी पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती दाखवली आहे. मात्र अनेक उपाययोजना करून सुद्धा हिंदमाता ची मुंबईहून तुंबई होणे काही थांबलेले नाही. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबाबा अशी प्रार्थना आम्ही बाप्पा केली असल्याचे फ्रांकलिन पाॅल यांनी सांगितले.