मुबंई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने १० जानेवारीपासून सुरू केलेल्या बूस्टर डोसला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी संपूर्ण मुंबईतून १० हजार ७०७ जणांनी बूस्टर डोस घेतला. यामध्ये ५ हजार २६५ आरोग्य कर्मचार्यांनी तर १ हजार ८३० फ्रंटलाईन आणि ६० वर्षावरील ३ हजार ६२६ जणांनी बूस्टरचा डोस घेतला.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार मुंबई महापालिका, राज्य सरकारची रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये बूस्टर डोसची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये तब्बल १० हजार ७०७ जणांनी बूस्टर डोस घेतला. यामध्ये पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ६ हजार २०९, राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये २ हजार ०३९, खासगी रुग्णालयांमध्ये २ हजार ७७५ जणांनी बूस्टर डोस घेतला. तसेच बूस्टर डोस घेण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ६० वर्षावरील ३ हजार ६२६ नागरिकांनी बूस्टरचा डोस घेतला. तर ५ हजार २६५ आरोग्य कर्मचार्यांनी आणि १ हजार ८३० फ्रंटलाईन वर्कर्सने बूस्टर डोस घेतला.