Voice of Eastern

मुंबई :

गर्भपातासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांच्या विक्रीप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केल्यानंतर आता मीशो या ऑनलाईन (Meesho.com) पोर्टलवरही या प्रकरणी एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातून Meesho.com या ऑनलाईन विक्री पोर्टलवर विना प्रिस्क्रीपशन एमटीपी किट (MTP Kit) या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने गर्भपाताच्या औषधांची विक्री करणार्‍या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

मीशो (Meesho.com) या ऑनलाईन पोर्टलवर सौंदर्य प्रसाधने, आभूषणे, वस्त्रे व इतर दैनंदिन वापराच्या वस्तू, ब्युटी अ‍ॅण्ड हेल्थच्या (Beauty & Health) नावाखाली मेकअप (Make up), वेलनेस (Wellness) आणि स्क्रीनकेअर (skincare) या प्रकारातील वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पोर्टलच्या मुखपृष्ठावर कोणत्याही नावाने औषध उपलब्ध असल्याची नोंद नाही. परंतु सर्च विंडोमध्ये (search window) एमटीपी (MTP) या नावाने शोध घेतला असता एमटीपी अ‍ॅबार्शन किट (MTP abortion kit), एमटीपी किट टॅब्लेट (MTP kit tablets), एमटीपी पिल्स (MTP Pills), एमटीपी टॅब (MTP tabs) इत्यादी पर्याय उपलब्ध होतात. यापैकी कोणताही पर्याय निवडल्यास गर्भपातासाठी वापरात येणार्‍या किट (Unwanted kit), डॉ. मोरेपेन एमटीपी किट (Dr. Morepen MTP kit) या ब्रँड नावाने विक्रीसाठी उपलब्ध असणार्‍या पॅकिंग मधील औषधांच्या प्रतिमा विक्रीसाठी प्रदर्शित होत असल्याचे आढळुन येते.

पोर्टलवर दाखवण्यात आलेल्या गर्भपाताच्या औषधांची मागणी एफडीएच्या अधिकार्‍यांनी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, जळगाव, नागपुर या ठिकाणाहून मीशो.कॉमवरून (Meesho.com) मागणी नोंदवली. ही मागणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय स्वीकारण्यात येऊन मुंबईमध्ये ९, ठाणे ३, कोल्हापूर, जळगाव, नागपूर व औरंगाबाद येथे प्रत्येकी एक अशा एकूण १६ एमटीपी किट (MTP kit) कुरियर पार्सल द्वारे पाठवण्यात आली. या औषधात Mankind Pharma व Dr. Morepan या उत्पादकांचे अनुक्रमे Unwanted kit, Dr Morepen, MTP kit ही औषधे वाराणसी, आग्रा, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील पुरवठादाराकडून पाठविण्यात आली होती. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करून गर्भपातासंदर्भातील औषधांची विक्री केल्याप्रकरणी एफडीएने मीशो (Meesho.com) आणि दिल्ली व उत्तरप्रदेश येथील विक्रेत्याविरुद्ध मुंबईत ६, ठाण्यात ३, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद व नागपूर येथे प्रत्येकी १ असे एकूण १३ प्रथम खबर अहवाल २२ एप्रिल ते ६ मे दरम्यान विविध कलमाखाली पोलीसांकडे दाखल करण्यात आली.

Related posts

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार – राजेश टोपे

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उभारणार ईएसआयसीचे रूग्णालय

मराठी माध्यमाच्या शाळेत बोली इंग्रजीचा महोत्सव!

Leave a Comment