Voice of Eastern

मुंबई : 

मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे १४.८२ कोटी रुपये थकविले असून पोलिसांच्या ३५ स्मरणपत्रांना केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे थकबाकी आधी वसूल केल्यानंतर क्रिकेट सामन्यास सुरक्षा द्यावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांस केली आहे.

मुंबई पोलिसांकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून भरावण्यात येणाऱ्या क्रिकेट सामान्यांना सुरक्षा पुरवतात. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले१४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ३५ स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : ओटीपी शेअर न करताही महिलेला साडेचार लाखांचा ऑनलाईन गंडा

मुंबई पोलिसांनी गेल्या ८ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष २०१३ मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष २०१६ चा विश्वचषक टी-२०, वर्ष २०१६ मधील कसोटी सामने, २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या ८ वर्षात फक्त २०१८ च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३५ स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर ९.५ टक्के व्याज आकारले जाणार आहे.

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. मुंबई पोलिसांनी याबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना ९ वेळा पत्रव्यवहार केला आहे पण ढिम्म गृह खाते प्रतिसाद देत नाही. मी याबाबत पत्रव्यवहार करत असून मुंबई पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई न केल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई पोलिसांना गांभीर्याने घेत नाही.

हेही वाचा : 

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य अधिकारी वर्गास पत्र पाठवून मागणी केली आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून १४.८२ कोटी थकबाकी वसूल न होइपर्यंत कोठल्याही क्रिकेट सामन्याला सुरक्षा न देणे आणि थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करावी.

Related posts

किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास १८ महिन्यांत पूर्ण होणार

मुंबई विद्यापीठाच्या २९ जूनच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; प्रवेशाची दुसरी यादी २८ जून रोजी

कल्याण डोंबिवलीत पहिल्या पावसात पाच हजारापेक्षा अधिक खड्डे; २० कोटी खड्ड्यात

Leave a Comment