Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

मध्य रेल्वेवर १४ तासांचा मेगाब्लॉक, या रेल्वे गाड्या होणार रद्द

banner

मुंबई :

ठाणे ते दिवा पाचवी आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मागच्या आठवड्यामध्ये ३६ तासांचा मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता. त्याच कामासाठी मध्य रेल्वेकडून पुन्हा १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. रविवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपासून दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेसच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

पायाभूत सुविधा ब्लॉकसह ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गांशी संबंधित अनावश्यक ठरलेल्या धीम्या मार्गांना जलद मार्गांशी जोडण्यासाठी आणि क्रॉसओव्हरची कामे करण्यासाठी हा १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी ते रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत डाऊन जलद मार्गावर १४ तासांचा तसेच रविवार दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपासून दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत अप जलद मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान, दिवा ते ठाणेदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर गाड्या धावतील.

या गाड्या होणार रद्द

शनिवार रद्द होणार्‍या गाड्या

 • नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई
 • कोयना एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

रविवारी रद्द होणार्‍या गाड्या

 • मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई तेजस एक्स्प्रेस, मुंबई
 • डेक्कन एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, जनशताब्दी
 • एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस

पनवेल येथे थांबणार्‍या एक्स्प्रेस

 • तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस (शुक्रवारी सुटणारी)
 • मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (शनिवारी सुटणारी)
 • मडगाव – मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस (शनिवारी सुटणारी)

पनवेलहून सुटणार्‍या एक्स्प्रेस गाड्या

 • लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस (रविवारी सुटणारी)
 • मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस (रविवारी सुटणारी)
 • मुंबई – मडगाव मांडवी एक्सप्रेस (रविवारी सुटणारी)

Related posts

शिवसेनेने दिले धावपट्टूच्या पायाला बळ !

Voice of Eastern

‘सर्जा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

Voice of Eastern

मोना डार्लिंगच्या प्रवासाला तांत्रिक बिघाडाचा फटका

Leave a Comment