Voice of Eastern

मुंबर्ई :

कामानिमित्त मुंबईत आलेले नागरिक हे होळी सणासाठी आपल्या गावी जात असतात. त्यामध्ये राज्यासह परराज्यातील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे होळीसाठी आपल्या गावी जाणार्‍या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेकडून १४ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये एलटीटी ते मऊ, वाराणसी, पुणे ते करमळी, पनवेल ते करमळी अणि मुंबई-दाणापूर या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या होळी विशेष रेल्वे गाड्यांचे १० मार्चपासून बुकिंग सुरु होणार आहे.

पुणे ते करमळीदरम्यान चार फेर्‍या चालवण्यात येणार असून, ट्रेन क्रमांक ०१०११११ ही गाडी १८ मार्चला पुणे येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल तर ट्रेन क्रमांक ०१०१२ ही विशेष गाडी १३ व २० मार्चला करमाळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल. पनवेल ते करमाळी चार फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ट्रेन क्रमांक ०१०१३ ही विशेष १२ आणि १९ मार्चला पनवेल येथून रात्री १० वाजता सुटेल. तर ट्रेन क्रमांक ०१०१४ ही गाडी १२ आणि १९ मार्चला करमाळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल. मुंबई ते मऊ दरम्यान दोन फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ट्रेन क्रमांक ०१००९ ही विशेश गाडी १५ मार्चला दुपारी २.१५ वाजता सुटेल. त्यानंतर ट्रेन क्रमांक ०१०१० ही विशेष गाडी १७ मार्चला सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी मऊ येथून सुटेल. मुंबई ते दानापूरदरम्यान ट्रेन क्रमांक ०१०१५ ही गाडी १५ आणि २२ मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी १०.३० वाजता सुटेल तसेच ट्रेन क्रमांक ०१०१६ ही गाडी १६ आणि २३ मार्चला दानापूर येथून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल.

Related posts

महाविकास आघाडीची आजही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

ठाकरेंचे सरकार ‘ना हलले ना फुलले’- नारायण राणे

कान्सच्या रेड कार्पेटवर वाइन रेड वेल्वेट ड्रेसमध्ये सनी लिओनने जिंकली प्रेक्षकांची मने

Leave a Comment