Voice of Eastern

मुंबई : 

मागचे सरकर चावी नाही तर गाजर वाटप करायचे आपण दिलेले शब्द पाळले आहेत. इथून कुठे जाऊ नका मुंबईत रहा असे भावनिक आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विक्रोळीतील मराठी माणसाला केले. तर येत्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त स्वबळावरच सत्ता आणायची आणि ती येणारच असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या ४११ कुटुंबियांना नवीन घरांच्या चाव्या गुरुवारी देण्यात आल्या. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. आशियातील सर्वात मोठे म्हाडा वसाहत असलेल्या कन्नमवार नगरमधील संक्रमण शिबिरांमधील इमारती या मोडकळीस आलेल्या होत्या. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते होते. मात्र आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने रहिवाशांना नवीन संक्रमण शिबिरात घर देण्यात आली आहे.

शिवसेनेची लाट कायम असते

संपूर्ण मुंबई आमची बालेकिल्ला आहे. पाऊस येतो पाऊस जातो. पण शिवसेनेची लाट कायम असते. ४१२ चाव्या करा आणि राज्याच्या विरोधीपक्षाला ती चावी द्या. आपण काय काम करतोय ते त्यांना कळू दे या राज्याचे मुख्यमंत्री कष्टकऱ्यांना गती देणारे सरकार आहे. अन्न वस्त्र निवारा हा आपला धर्म आहे आणि शिवसेना तो पाळत आहे. मी दोन दिवसापूर्वी राहुल गांधींना भेटलो. ते मला नेहमी विचारतात शिसवेनेचे यशाचे रहस्य काय त्यांना मी सांगणार हे ४११ घराच्या चाव्या हे रहस्य आहे. म्हणजे आम्ही काम करतो असे त्यांना सांगणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

निवडणुकीचे रणशिंग फुकले

मुबंई महापालिका निवडणूक आली आहे.  निवडणूका येतील आणि जातील भगवा कायम असेल. यावेळी स्वबळावर भगवा फडकवायचा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त स्वबळावरच सत्ता आणायची आणि ती येणारच असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आम्ही गाजर वाटप करत नाही

या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री या भागाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील जोरदार बॅटिंग केली. देशातील राजकीय वातावरण बदलायचे आहे. देशात आपला बालेकिल्ला तयार करायचा आहे. बीडीडी पुनर्विकासाचा संबंधात बोलताना मागच्या सरकर चावी नाही तर गाजर वाटप करायचे आपण जे शब्द दिले आहेत ते पाळले आहे. इथून कुठे जाऊ नका मुंबईत राहा असे आवाहन आदित्यने मराठी माणसाला केले.

Related posts

मुंबईत जप्त ड्रग्जची किंमत ऐकूण व्हाल थक्क

Voice of Eastern

मेट्रो गर्डर टाकण्यासाठी घोडबंदर रोडवर वाहतुकीस बंदी; ८ ते १७ जुलै दरम्यान बंदी

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी संघटनेचा परिचारिकांच्या आंदोलनाला पाठिंबा

Voice of Eastern

Leave a Comment