
मुंबई :
परळ येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ख्रिसमस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विविध आजारांशी झुंजणाऱ्या हॉस्पिटलच्या कॅन्सर, कार्डियाक, न्यूरो, नेफ्रोलॅाजी आणि बाह्यरुग्ण विभागातील मुलांनी या कार्यक्रमात मुलांनी मनसोक्त आनंद लूटला.
रूग्णालयाने नृत्य, ख्रिसमस ट्री सजावट, कॅरोल्स आणि बबल शो सह अनेक आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध हॉस्पिटलच्या कॅन्सर, कार्डियाक, न्यूरो, नेफ्रोलॅाजी आणि बाह्यरुग्ण विभागातील 100 हून अधिक मुलं यामध्ये सहभागी झाले होते. नाताळ हा एक आनंदाचा काळ आहे जो सर्वांना एकत्र आणतो आणि प्रेम, आनंद आणि एकतेचे प्रतिक आहे. या उत्सवाची सुरुवात जादूच्या प्रयोगाने करण्यात आली. त्यानंतर नृत्य सादरीकरण, कॅरोल सिंगींग, रोमांचक खेळ आणि केक कापण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता सांताच्या विशेष भेटीने झाली, त्यांनी चॉकलेट्स, खाऊ आणि भेटवस्तू दिल्या.
या उत्सवामुळे मुलांना केवळ आनंदच नाही तर सुरु असलेल्या वैद्यकीय उपचारांमुळे आलेले नैराश्य, नकारात्मकता देखील दूर झाली. विविध आजारांशी लढा देत असताना, या आनंदाच्या क्षणांमुळे त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि उपचारांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो अशी प्रतिक्रिया वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ मिनी बोधनवाला यांनी व्यक्त केली.