क्रीडा

चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : अधवान, कथितचे नॉनस्टॉप जेतेपद

निधिष, गिरिषा, एडन, आर्यन, विराज, रुद्र अव्वल

मुंबई :

शाळेची सुट्टी संपण्यापूर्वी शालेय बुद्धिबळपटूंसाठी विसडम चेस ॲकॅडमीने आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ७ वर्षाखालील गटात अधवान ओसवाल आणि ८ वर्षाखालील गटात कथित शेलारने नॉनस्टॉप सहा विजय नोंदवत अव्वल सहा गुणांसह बाजी मारली. तसेच विविध सहा गटात निधिष खोपकर, गिरिषा पै, एडन लसराडो, आर्यन पांडे, विराज राणे आणि रुद्र कांडपाल यांनी पहिले स्थान पटकावत यश संपादले.

शालेच बुद्धिबळपटूंना आपल्याच वयोगटातील मुलांविरुद्ध बुद्धिकौशल्य दाखवता यावे म्हणून फिडे आर्बिटर आणि आयोजक अक्षय सावंतने मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत तब्बल ४०० पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग लाभला आणि त्यापैकी १२० खेळाडूंना रोख पुरस्कार आणि आकर्षक बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. एकंदर ८ वयोगटात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अव्वल स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. अपवाद अधवान ओसवाल आणि कथित शेलार या बालबुद्धिबळपटूंचा. त्यांनी आपल्या गटात सर्वच प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत गटविजेतेपद पटकावले. उर्वरित सहा गटात एकाही खेळाडूला सलग सहा विजय नोंदविता आले नाहीत.

६ वर्षाखालील गटात निधिष खोपकर ४.५ गुणांसह पहिला आला तर ९ वर्षाखालील गटात राज्य अजिंक्यपद मिळवणारी गिरिषा पै अव्वल ठरली. ती आणि डायटीन लोबो यांनी प्रत्येकी ५.५ गुण मिळवले होते आणि दोघांचे गुण समान असल्यामुळे सरस गुणांच्या आधारे गिरिषाला प्रथम क्रमांक देण्यात आला.

११ वर्षाखालील गटातही आर्यन पांडे आणि अश्वी अगरवाल यांच्यात समान गुणसंख्येनंतर आर्यन पहिला आला. १३ वर्षाखालील गटातही विराज राणे आणि आदित्य कदम यांच्यात अव्वल स्थान सरस गुणांच्या आधारे ठरले. या स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांना ४,३,२,१.५ आणि १ हजारांचे रोख इनाम देण्यात आले. तसेच प्रत्येक गटातून एका सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या मुलीला रोख २१०० रुपयांचे इनाम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा पुरस्कार सोहळा वालिया महाविद्यालयाचे विश्वस्त भारत वालिया यांच्या हस्ते पार पडला.

मुंबई मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल

६ वर्षाखालील : १.निधीष खोपकर २. कियांश गुप्ता ३. कृतिन सिंग, ४. रियान मुणगेकर, ५. अवीर शाह, सर्वोत्तम मुलगी : कायरा अगरवाल.

७ वर्षाखालील : १. अधवान ओसवाल २. आरव देशमुख, ३. राजवीर घुमान, ४. अवीर शाह, ५. नीव चौहान, सर्वोत्तम मुलगी : इमिली दास.

८ वर्षाखालील : १. कथित शेलार, २. डायटीन लोबो, ३. जियांश शाह, ४. आरव देशमुख, ५.अगस्त्य पटवा, सर्वोत्तम मुलगी : इमिली दास.

९ वर्षाखालील : १. गिरिषा पै, २. डायटीन लोबो, ३. रियांश बोराडे ४. कथित शेलार, ५.आरव धामापुरकर, सर्वोत्तम मुलगी : ओमिशा आनंद.

१० वर्षाखालील : १. एडन लासराडो, २. गिरिषा पै, ३.लक्ष परमार, ४. देवांश डेकटे, ५.रियांश बोराटे, सर्वोत्तम मुलगी : अश्वी अगरवाल.

११वर्षाखालील : १. आर्यन पांडे, २. अश्वी अगरवाल, ३.देवांश डेकटे, ४. गौरव बोरसे, ५.धैर्य बिजलवान, सर्वोत्तम मुलगी : आस्था पाणीग्रही.

१३वर्षाखालील : १. विराज राणे, २. आदित्य कदम, ३.यश टंडन, ४. आरुष नाडर, ५.अगस्त्य खानका, सर्वोत्तम मुलगी : आध्या वर्दे.

१५ वर्षाखालील : १. रुद्र कांडपाल, २. हृदय मणियार, ३.शौर्य खाडिलकर, ४. विराज राणे ५.शिवांक झा, सर्वोत्तम मुलगी : मान्य बालानी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *