मुंबई :
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असताना केईएम रुग्णालयातील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील तब्बल २२ विद्यार्थ्याना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थी ट्रॅव्हल रिपोर्ट घेऊन आपल्या घरी चालले आहेत.
केईएममधील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थ्यांना कोरोना लागण झाली आहे. दोन दिवसांमध्ये २२ विद्यार्थ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे विद्यार्थी काही दिवसांपूर्वी ‘आविष्कार’ या वार्षिक कार्यक्रमाच्या तयारीसाठी एकत्र आले होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांमध्ये ताप, सर्दी सदृश्य लक्षणे दिसू लागली. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. हे सर्व विद्यार्थी होस्टेलमध्ये राहणारे आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांनी तातडीने राजा घेऊन घराचा रस्ता धरला आहे.
क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची भीती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.