Voice of Eastern

मुंबई :

मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यामार्फत १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर एक्सप्रेस इन् हॉटेलच्या समोर, साकीनाका येथे झडपा बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १० मे रोजी सकाळी १० पासून ते ११ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत कुर्ला येथील काही भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर काही भागात पाणी कपात कारण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्वांसाठी पाणी या धोरणाची शनिवारीच घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता सर्व घरात पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र या घोषणेला २४ तास होण्यापूर्वीच पालिकेने पाणी पुरवठा खात्यामार्फत वरील काम काढल्याने पालिकेच्या घरोघरी पाणी या धोरणावर काहीसे विरजण पडल्यासारखे झाले आहे. कुर्ला भागातल्या नागरिकांनी पाणी पुरवठा बंद अथवा पाणी कपात होण्यापूर्वीच आवश्यक पाण्याचा साठा करून तो पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत जपून वापरावा , असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

या विभागात असेल पाणीपुरवठा बंद

‘एल’ विभाग : 

जरीमरी, शांती नगर, तानाजी नगर, श्री कृष्णा नगर , सत्या नगर पाईप लाईन मार्ग, वृन्दावन खाडी नंबर ३, आशा कृष्णा इमारत, अन्नासागर इमारत, तिलक नगर, साईबाबा कंपाऊंड , डी सिल्वा बाग, एल. बी. एस. नगर, शेठीया नगर, सोनानी नगर, महात्मा फुले नगर, बरेली मस्जिद परिसर, शिवाजी नगर, अंधेरी कुर्ला मार्ग, अनिस कंपाऊंड, अंबिका नगर, सफेद पूल, उदय नगर (सकाळी ६.०० ते दुपारी १.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान १० मे रोजी पाणीपुरवठा सकाळी ६.०० ते सकाळी १०.०० या वेळेत होईल आणि सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. ११ मे रोजी सकाळी १०.०० पर्यंत पाणीपुरवठा होणार नाही आणि सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.)

 ‘कुर्ला दक्षिण’ : 

काजूपाडा, बैल बाजार, नवपाडा, एल. बी. एस. मार्ग, सुंदरबाग, ख्रिश्चन गांव, न्यू मिल मार्ग, हलाव पूल, मसरानी गल्ली, ब्राह्मण वाडी इत्यादी (सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.४५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान १० मे आणि ११ मे रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.).

Related posts

भटक्या कुत्र्यांचा दरवर्षी सरासरी ६५ हजार लोकांना चावा

कोरोना विधवांची राज्य सरकारकडून चेष्टा; ‘मिशन वात्सल्य’ अभियान अपयशी

मुंबईमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था अयोग्य : आयआयटी मुंबई

Voice of Eastern

Leave a Comment