Voice of Eastern

मुंबई : 

राणीबाग या नावाने प्रसिद्ध असलेल्या भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि  प्राणिसंग्रहालयाच्या संचालक कार्यालयाकडून आरटीआय कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेने  गेल्या ४ वर्षांत म्हणजेच २०१८ ते २०२१ पर्यंत तब्बल २४३.६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. भायखळा प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील माहितीनुसार एंट्री प्लाझा, अंतर्गत पॉकेट गार्डन, सार्वजनिक सुविधा, सीसीटीव्ही बसवणे, इंटरप्रिटेशन सेंटर, पेंग्विन प्रदर्शन, तृणभक्षकांसाठी क्वारंटाईन, प्राणीसंग्रहालय, किचन कॉम्प्लेक्स, हेरिटेज स्ट्रक्चरची जीर्णोद्धार यासाठी तब्बल ९५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

फेज २ मध्ये १० प्रदर्शनांवर ६२.९१ कोटी रुपये खर्च करण्यात आले ज्यात लांडगा, अस्वल, मांजरीचे कॉम्प्लेक्स, कोल्हा, तरस , बिबट्या, मगरिंचे, पक्षांचे जाळं, कासवांचे तलाव आणि ऊद आहे. फेज २ मधील निविदामध्ये वाघ, सिंह, सांबर आणि भुंकणारे हरण, नीलगाय,  चार शिंग मृग, दलदल हरण, काळवीट आणि दुसरे पक्षांचे जाळे यासाठी  ५७.११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी ४ वर्षांत एकूण १९.११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्राणिसंग्रहालयातील उद्यानांच्या देखभालीसाठी बीएमसीने गेल्या ४ वर्षांत तब्बल ९.५२ कोटी खर्च केले आहेत.

‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन’ चे संयोजक जितेंद्र घाडगे म्हणाले, आपल्या जवळचा कॉन्ट्रॅक्टरला टेंडर मिळून द्यायचं आणि नंतर त्याच कामामध्ये अधिक खर्च काढायचा हे मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या टेंडरच समीकरण झालं आहे. ‘कॉस्ट एस्केलेशन’ ही बीएमसीवर सत्ता गाजवणाऱ्या भ्रष्ट नागरी अधिकारी, कंत्राटदार आणि राजकारण्यांची खेळी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट करताना या  भ्रष्टाचाऱ्यांना कोणतीही भीती किंवा मर्यादा दिसून येत नाही.”

Related posts

दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ऑस्ट्रेलियामध्ये दुमदुमणार ४२ नवगीतांमधून शिवचरित्र

Voice of Eastern

मुंबई महापालिकेचा पवई तलाव भरुन वाहू लागला

Leave a Comment