मुंबई
आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत विक्रोळीच्या कन्ननमावर नगर ची ओळख आहे.कन्ननमावर नगर येथून दादर ला जाण्यासाठी बेस्टची 354 क्रमांकाची बस सुटत होती. बसला चांगला प्रतिसाद असताना चुकीचं सर्वेक्षण करून ही बस वडाळा आगारपर्यंत करण्यात आली. यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर याबाबत पत्र व्यवहार करत बेस्ट प्रशासनाला या मार्गावर पुन्हा बस सेवा सुरू करावी अन्यथा लोक चळवळ उभी करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
कन्नमवार नगर येथून 354 ही बस थेट छत्रपती शिवाजी पार्क येथे जात होती. मात्र बेस्ट प्रशासनाने दुपारच्यावेळी सर्वेक्षण करून या बस चा मार्ग बदलला आहे. जी चुकीची पद्धत आहे. त्यांनी लोकांचं आणि स्थानिक प्रतिनिधींचा मत घेणं आवश्यक होतं मात्र त्यांनी असे केले नाही. या बसा मार्गाचा वडाळा डेपोचा करण्यात आलेला आहे. यामुळे सायन येथे उतरून पुन्हा दुसऱ्या बसची वाट बघू मग दादरला जावे लागे यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे लवकरात लवकर 354 क्रमांकाच्या बस चा मार्ग पूर्ववत करावा अशी मागणी आणि आम्ही बेस्ट प्रशासनाला केली आहे अन्यथा जोरदार आंदोलन करू असे मनसे शाखा अध्यक्ष जयंत दांडेकर यांनी सांगितले.
भाजपही मैदानात
या बसचा मार्ग पूर्ववत व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष देखील मैदानात उतरला आहे. यासाठी बुधवारी सह्यांची मोहीम घेण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून या बस चा मार्ग पूर्वीसारखा व्हावा यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे.