मुंबई :
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहाव्या मार्गिकेच्या रूळांचे कट व कनेक्शन आणि क्रॉसओव्हरसाठी ठाणे ते कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी २ ते सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल गाड्या, मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या असून, काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
मध्य रेल्वेवर घेण्यात येणार्या मेगाब्लॉकपूर्वी शनिवारी दुपारी १ ते २ दरम्यान कल्याण ते माटुंगादरम्यान अप धीम्या/अर्धजलद गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत. दुपारी २ नंतर अप धीमी/अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर लोकल थांबणार नाही. शनिवारी दुपारी १२.५४ ते १.५२ वाजेपर्यंत दादरहून सुटणार्या धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. दुपारी २ नंतर डाऊन धीम्या गाड्या मुलुंड ते कल्याणदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील.
मेगाब्लॉक काळात ठाणे ते विटावा रोडदरम्यान पुलाखाली नवीन टाकलेला ट्रॅक कट करून सध्याच्या डाऊन आणि अप धीम्या मार्गांशी जोडला जाईल. त्याचप्रमाणे क्रॉसओवर, टर्न आऊट, यार्ड रीमॉडेलिंगच्या संदर्भात रुळावरील डिरेलींग स्विच तसेच ठाणे आणि कळवा येथील इंटरलॉकिंग व्यवस्थेत बदल करणे व चालू करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ७ टॉवर वॅगन, ३ युनिमॅट/ड्युओमॅटिक मशीन, २ डिझेल मल्टी लोको, एक बॅलास्ट रेक, १ डीबीकेएम इत्यादींचा वापर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल व दूरसंचार कामांसाठी केला जाणार आहे.
या गाड्या होणार रद्द
शुक्रवार-शनिवार सुटणार्या गाड्या
- नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती- मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
शनिवार-रविवारी सुटणार्या गाड्या
- मुंबई -पुणे -मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-जालना- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई- आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस, मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई -नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई – गदग एक्स्प्रेस, मुंबई- नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस
रविवार-सोमवारी सुटणार्या गाड्या
- आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, गदग-मुंबई एक्स्प्रेस
पुण्यापर्यंतच चालवण्यात येणार्या गाड्या
शुक्रवारी आणि शनिवारी सुटणार्या गाड्या
- हुबळ्ळी-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस
शनिवारी आणि रविवारी सुटणार्या गाड्या
- मुंबई – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, दादर- हुबळ्ळी एक्स्प्रेस