Voice of Eastern

मुंबई :

मुंबई महापालिकेच्या किटकनाशक खात्याच्या मूषक संहारक पथकाने गेल्या २ वर्षात तब्बल ४ लाख उंदीर, घुशी यांची कत्तल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्यापही सामान्य नागरिकांना झोपडपट्टीत तर काही निवडक सोसायटीमध्येही उंदीर, घुशी यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत आहे. पालिका किटकनाशक विभागातर्फे मूषक संहारक मोहीम हाती घेऊन उपद्रवी उंदीर, घुशी यांची रात्रीच्या सुमारास कत्तल करण्यात येते.

प्राप्त माहितीनुसार, पालिकेने उंदीर, घुशी यांचा उपद्रव रोखण्यासाठी व त्यांचा संहार करण्यासाठी मार्च २०२० मध्ये मुंबईतील २२ प्रभागांसाठी मुषक नाशक म्हणून खासगी संस्थाची नियुक्ती केली होती. या मूषक संहारक पथकाने मार्च २०२० पासून ते जानेवारी २०२२ पर्यंत २ वर्षात तब्बल ४ लाख १३ हजार ४९२ उंदरांची कत्तल केली आहे. जानेवारी २०२० मध्ये ४ लाख ९८ हजार ४३८ रुपये खर्चून २५ हजार १८ मुषकांचा खात्मा करून त्यांना यमसदनी धाडले. त्यानंतर ४६ लाख ८२ हजार २४ रुपये खर्चून फेब्रुवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या काळात २ लाख ३२ हजार ९०४ उंदीर, घुशी यांची कत्तल करून त्यांची यमसदनी रवानगी करण्यात आली.
त्यानंतर, २७ लाख ६९ हजार रुपये खर्च करून मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या काळात १ लाख ५५ हजार ५७० उंदीर, घुशी यांची कत्तल करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला.

मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाचा प्रस्ताव कार्योत्तर मंजूरीसाठी मागील आठवड्यात पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उंदरांबाबत वरीलप्रमाणे माहिती दिली आहे. उंदीर, घुशी मारण्यासाठी पालिकेने १ कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती दिली आहे. त्यावेळी, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उंदीर मारण्याच्या कंत्राट कामावर १ कोटींचा निधी खर्च झाल्याने आक्षेप घेतला होता तसेच, पालिकेने कोणत्या विभागात, किती उंदीर मारले अशी विचारणा करीत पालिकेला फैलावर घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर पालिकेने एक कोटींचा निधी कसा व कुठे खर्च केला याची माहिती दिली आहे.

Related posts

सात दिवसांच्या बाप्पाला मुंबईकरांचा निरोप !

ग्रामीण भागात एक लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा किटचे वाटप; ठाणे जिल्हा प्रशासनाचा दावा

जोरदार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत

Voice of Eastern

Leave a Comment