Voice of Eastern
ताज्या बातम्या

तिसर्‍या लाटेविरोधात गणेश मंडळांचे ४५० कार्यकर्ते सज्ज

banner
  • मुंबई

ऑक्टोबरमध्ये येणारी कोरोनाची तिसरी लाट आणि गणरायाचे आगमन या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेश मंडळे पुढे सरसावले आहेत. तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी विविध गणेश मंडळानी त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे. ४५० कार्यकर्त्यांची असलेली ही फौज नागरिकांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यापासून ते त्यांना उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच हे कार्यकर्ते नागरिकांना कोरोनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये विविध सणांची सुरुवात झाली आहे. यातच आठवड्याने गणरायाचे आगमन होणार असल्याने बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, आरोग्यसेविका सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. मात्र गणरायाच्या आगमनामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य गणेशभक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्यांना कोरोनाचे नियम समजावून सांगण्यासाठी विविध गणेश मंडळातील सुमारे ४५० कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. हे कार्यकर्ते कोरोना रुग्णांना रुग्णवाहिनी उपलब्ध करुन देणे, ऑक्सिजन उपलब्ध करुन देणे, रुग्णासांठी बेड उपलब्ध करुन देणे, रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे, खाद्यपदार्थ पुरवणे, तसेच कोरोना संकटात लागणारी मदत पुरवण्यासाठी सज्ज असणार आहेत. आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट आली तरी, तिला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहीबावकर यांनी सांगितले.

Related posts

एनएससीआय स्नूकर ओपनच्या पात्रता फेरीत १२८ क्यूईस्टचा सहभाग

राष्ट्रीय कॅरम – महाराष्ट्राच्या दोनही संघाची उपांत्य फेरीत धडक 

मुंबई व मुंबई उपनगरचा किशोर-किशोरी खो-खो संघ जाहीर

Leave a Comment