Voice of Eastern

मुंबई : 

आर्थिक स्थिती कोलमडलेल्या महावितरणसमोर थकबाकी वसुली करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ग्राहकांना वारंवार आवाहन करूनही वीज बिल भरण्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे भांडूप परिमंडळातील विविध वर्गवारीतील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांकडे ४७९.१२ कोटींची थकबाकी आहे. ग्राहकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन थकीत व चालू वीजबिल भरावे असे आवाहन भांडूप परिमंडळाकडून करण्यात आले आहे.

भांडूप परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांकडे वीज देयकाची पूर्वीची थकबाकी व चालू वीजबिल मिळून ४७९.१२ कोटी रुपये थकबाकी आहे. यामध्ये उच्चदाब ग्राहकांची थकबाकी व चालू वीजबिल मिळून ७९.७१ कोटी असून लघुदाब ग्राहकांची थकबाकी व चालू वीजबिल मिळून ३९९.४१ कोटी रुपये आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांची ८६.३४ कोटी, व्यावसायिक ७६.१६ कोटी, औद्योगिक ५५.६५ कोटी, पाणीपुरवठा योजनांचे ६.३० कोटी, स्ट्रीट लाईट १६४.२५ कोटी, इतर ग्राहकांची ८.३८ कोटी तर कृषीपंप ग्राहकांचे २.३४ कोटी थकीत आहे. महावितरणतर्फे कृषीग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील वीजबिल वसुलीसोबतच थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु आहे.

वाढत्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरणवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. ते दूर करण्यासाठी वीज ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करावेत. जर ग्राहकांनी नियमितपणे आपले वीज बिल भरले तरच भविष्यात सुद्धा चांगली व सक्षम सेवा देणे महावितरणला शक्य होईल असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

Related posts

या गोष्टींमुळे तरुणांना रेल्वे भरतीचे मार्ग होतील बंद

Voice of Eastern

सावधान… वाढत्या तापमानामुळे मोबाईलचा स्फोट; महाडमध्ये बालिका जखमी

स्वागत मान्सूनचे, कर्तव्य जलपुनर्भरणाचे…

Leave a Comment