मुंबई :
प्रजासत्ताक दिन २०२२ निमित्त देशातील ९३९ पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात आली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील ५१ पोलीसांना पदके प्रदान करण्यात आली
पोलीस कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये १८९ पोलीस शौर्य पदके आहेत. तर विशिष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची (पीपीएम) संख्या ८८, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) ६६२ इतकी पदे देण्यात आली आहेत. पोलिसांना देण्यात आलेल्या १८९ शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक १३४ पुरस्कार जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील शौर्य कामगिरीबद्दल तिथल्या पोलिसांना प्रदान करण्यात आली आहेत. अतिरेकी डाव्या विचारसरणीने प्रभावित भागातील ४७ पोलीस आणि ईशान्य प्रदेशात एक पोलिसांस त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कृत केले आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये ११५ जवान जम्मू-काश्मीर पोलिस, ३० सीआरपीएफ, ३ आयटीबीपी, २ बीएसएफ, ३ एसएसबी, १० छत्तीसगड पोलिस, ९ ओडिशा पोलिस आणि ७ महाराष्ट्र पोलिस आणि उर्वरित राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशातील आहेत.
पोलिस शौर्य पदक विजेते
- गोपाल मणिराम उसेंडी, एपीएस आयपीएमजी
- महेंद्र गानू कुलेती, एनपीसी पीएमजी
- संजय गणपती बकमवार, पीसी पीएमजी
- भरत चिंतामण नागरे, पीएसआय पीएमजी
- दिवाकर केसरी नरोटे, एनपीसी पीएमजी
- निलेश्वर देवाजी पाडा, एनपीसी पीएमजी
- संतोष विजय पोटावी, पीसी पीएमजी
राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त अधिकारी
- विनय महादेवराव करगावकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई,
- प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट, एस.आर.पी.एफ.जीआर.व्हीआय, धुळे,
- चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक, पी.टी.सी. दौंड, पुणे
- अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक. नांदेड