Voice of Eastern

मुंबई

ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागामध्ये आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये अन्य इयत्तांच्या शाळा सुरू करण्याबाबत पालकांकडून विचारणा होत होती. राज्य सरकारने १ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या म्हणजेच संपूर्ण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील पहिले ते बारावीचे असे २ कोटी २१ लाख ७४ हजार ६२५ विद्यार्थी आता शाळेत जातील. यामध्ये ८५ लाख विद्यार्थी दोन वर्षांनंतर प्रथमच शाळेत जाणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध आस्थापने, बाजारपेठा, रेल्वे प्रवास, बस प्रवास, आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय प्रवासाला मुभा देण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रातही कोरोनाचा कमी होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रथम ग्रामीण भागात त्यानंतर शहरी भागातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. सध्याच्या घडीला राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळांमधील वर्ग सुरू ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर आता राज्यातील २ कोटी २१ लाख ७४ हजार ६२५ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची तयारी करावी लागणार आहे. यामध्ये पहिले ते चौथीचे विद्यार्थी तसेच शहरी भागातील पाचवी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थी असे मिळून ८५ लाखांच्या आसपास विद्यार्थी दोन वर्षांनंतर प्रथमच शाळेत जाणार आहेत. प्रथमच शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही ७८ लाख ४६ हजार ५४२ इतकी आहे. तर पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांची संख्या ७ लाखांच्या आसपास आहे. पाचवी ते आठवीमधील मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख २० हजार ४४ इतकी आहे.

इयत्ता पहिली ते चौथीमध्ये प्रथमच शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये ३३ लाख ६० हजार ४३६ विद्यार्थी हे सरकारी शाळेतील आहेत. तर खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख ६८ हजार ३३४ इतकी असून, खासगी विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या २६ लाख ५८ हजार ९०३ आणि मान्यता प्राप्त नसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ७७ हजार २१७ इतकी आहे. यामध्ये मान्यताप्राप्त व मान्यता नसलेले मदरशांचाही समावेश होतो.

इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची संख्या
इयत्ता पहिली – १८,९९,४७०
इयत्ता दुसरी – १९,६४,३२३
इयत्ता तिसरी – १९,७७,२३१
इयत्ता चौथी – २०,०५,५३६
एकूण ७८,४६,५४२

शाळानिहाय विद्यार्थी संख्या
सरकारी शाळा – ३३,६०,४३६
खासगी अनुदानित शाळा – १४,६८,३३४
खासगी विनाअनुदानित शाळा – २६,५८,९०३
मान्यता प्राप्त नसलेल्या शाळा – ७७,२१७

Related posts

आनंदाने शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Voice of Eastern

आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून चांदीवलीतील भक्तांच्या सुविधेसाठी छठ पुजेची व्यवस्था

Voice of Eastern

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवावा -मुख्यमंत्री

Leave a Comment