Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

बारावी परीक्षेच्या आदल्या रात्री १२ वाजेपर्यंत ९३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले

banner

मुंबई : 

कोरोना व एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाकडून बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुभा दिली होती. त्यानुसार मागील १० दिवसांमध्ये मुंबईतून तब्बल ८५०० विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरले तर परीक्षेच्या आदल्या रात्री १२ वाजेपर्यंत ९३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. या सर्व विद्यार्थ्यांची राज्य मंडळाकडून परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

दहावी, बारावीचा एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुभा दिली होती. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज करण्यासाठी ३ मार्चला सकाळी ११ वाजेपर्यंत वेळ दिली होती. मात्र अर्ज करण्यासाठी परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात राज्य मंडळाच्या मुंबई कार्यालयात गर्दी केली होती. अनेक विद्यार्थी गावी असल्याने किंवा काही विद्यार्थ्यांच्या घरात वैद्यकीय समस्या असल्याने त्यांना अर्ज भरता आला नव्हता. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आदल्यादिवशी अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाच्या कार्यालयात धाव घेतली. मुंबई विभागातंर्गत येणार्‍या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून रात्री उशीरापर्यंत अर्ज करण्यात आले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे तातडीने अर्ज भरून घेतले. त्यानंतर त्यांच्या परीक्षा केंद्राची व्यवस्था करून त्यांना हॉलतिकिटही उपलब्ध करून दिले. ही प्रक्रिया ३ मार्चला रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती. ३ मार्चला रात्री १२ वाजेपर्यंत राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी ९३ विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेत त्यांच्या परीक्षेची व्यवस्था केली. परीक्षेच्या आदल्या दिवशीप्रमाणचे बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मागील १० दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून राज्य मंडळाच्या कार्यालयात गर्दी करण्यात येत होती. राज्य मंडळाने या १० दिवसांमध्ये तब्बल ८५०० विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदवून घेण्यात आले. त्यामुळे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची संधी दिल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांवर होणार कारवाई

अर्ज भरण्याची अंतिम मुदत सप्टेंबरपर्यंत होती. त्यानंतर अर्ज भरण्याची मुभा दिल्यानंतर प्राचार्य व शिक्षकांनी अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना बोलवून त्यांच्या अडचणी समजून घेऊन अर्ज भरणे अपेक्षित होते. अर्ज भरण्याची जबाबदारी प्राचार्य व शिक्षकांची असतानाही त्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थी व पालकांना अर्ज घेऊन मंडळाकडे पाठवले. त्यामुळे ज्यांनी परीक्षेचे अर्ज विलंबाने सादर केले अशा सर्व पालक, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना परीक्षा झाल्यानंतर मंडळामध्ये बोलवून त्यांची सविस्तर चौकशी करण्यात येईल, त्यामध्ये दोषी आढळल्यास शाळेचा सांकेतांक क्रमांक रद्द करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष नितीन उपासणी यांनी दिली.

Related posts

वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग्ज अनिवार्य

२०१३ मध्ये पालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेला सुरुवात

Leave a Comment