Voice of Eastern

मुंबई :

महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती असून जेएसडब्लू कोकणामध्ये सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पेण ( रायगड ) येथील जेएसडब्लू निओ एनर्जी प्रकल्पाच्या सामंजस्य करारासंदर्भात आयोजित मंत्रालयातील बैठकीत मंत्री सामंत बोलत होते. जेएसडब्लूच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून थेट सुमारे ४५० तरूणांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होणार आहे. तरुणांना जास्तीत – जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग काम करीत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारे आपले सरकार आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरूणांना रोजगार देण्याचा मानस राज्य सरकारचा असून त्याअनुषंगाने उद्योग विभाग कार्य करीत आहे. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन व सर्व संबंधित उपस्थित होते.

Related posts

मनसेचे ३० हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर

ठाणेवैभव स्पर्धा : लार्सन टूर्बोची आगेकूच

यंदा दिल्लीला ट्रॉफी उंचावण्याची संधी – सुनील गावस्करांची भविष्यवाणी

Voice of Eastern

Leave a Comment