Voice of Eastern
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

प्राचार्यांसह शिक्षकांना धमकवल्याप्रकरणी आरपीआय उपाध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल

banner

भिवंडी :

शिक्षिकेने विद्यार्थ्याला शहरातील महाविद्यालयात कॉपी करताना पकडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी भिवंडी आरपीआय उपाध्यक्षाने प्राचार्यांसह उपप्राचार्य व शिक्षकांना शिवीगाळ करीत उप प्राचार्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना महाविद्यालयात घडली असून  याप्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून आरपीआय उपाध्यक्षावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादू गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आरपीआय पक्षाच्या उपाध्यक्षाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा प्रेमनाथ मिटकर ह्या शिक्षिका आहेत. शहरातील बीएनएन महाविद्यालयात चौथ्या माळ्यावर नुकतीच कला शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या भूगोल विषयाची परीक्षा सुरू असताना प्रतीक्षा मिटकर ह्या पर्यवेक्षकाचे काम पाहत होत्या. त्यावेळी शिक्षिकेने रुपेश बनसोडे या विद्यार्थ्यास कॉपी करताना पकडून सदर बाबीची तक्रार प्राचार्यांकडे करणार असल्याचे विद्यार्थ्याला सांगितले.त्यानंतर रुपेशने वर्गाबाहेर जाऊन थोड्या वेळाने तो आरोपी दादु गायकवाड यास सोबत घेऊन वर्गात आला. याप्रसंगी दादूने शिक्षिकेसह देशपांडे यांना कॉपी पकडल्याबद्दल जाब विचारत मोठ मोठ्याने ओरडून शिवीगाळ केली.

तसेच पर्यवेक्षक रुपेश पाटील, रसिका घरत, विद्या कांबळे, अनिल लोहार आदी शिक्षकांसह प्राचार्य अशोक वाघ व उपप्राचार्य सुवर्णा रावल यांना शिवीगाळ करीत उपप्राचार्या सुवर्णा रावल यांना त्या राहत असलेल्या चरणीपाड्यात जाऊन त्यांचा खून करण्याची धमकी दिली आहे. या धमकी प्रकरणी शिक्षिका प्रतिक्षा मिटकर यांच्या फिर्यादीवरून आरपीआय उपाध्यक्ष दादू गायकवाडच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे करीत आहेत.

Related posts

राष्ट्रवादीमुळेच शिंदेसरकारला पेट्रोल – डिझेलवरील दरकपात शक्य झाली

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Voice of Eastern

गिर्यारोहण क्षेत्रात आवड आहे, आता या अभ्यासक्रमातून मिळणार शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

Leave a Comment