- मुबंई:
चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून सर्च व निब्बाण शैक्षणिक व सामाजिक संस्था ( नेस्ट – सेव ) संस्थेच्या वतीने मेडिकल किट वाटप करण्यात आले.महाड व चिपळूण परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे.
त्या ठिकाणच्या नागरिकांना मदतीची गरज आहे. याकरिता सामाजिक बांधिलकी जोपासत चेंबूर येथील निब्बाण शैक्षणीक व सामाजिक संस्था( नेस्ट – सेव ) व सर्च या संस्थेच्या वतीने महाड व चिपळूण मधील पेढे, कोरसे, चिपळूण, पोसरे, पेठमाप, गोवळकोट, कलमस्टे, करमबोली 500 पेक्षा अधिक पूरग्रस्त घरांना मेडिकल किट, वही, न्युन्ट्रीक वाटप करीत एक मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव विशाल गायकवाड, संचित तांबे, चिपळूण रेल्वे स्थानकांचे व्यवस्थापक नवनीत गमरे, समाजसेवक शशिकांत गमरे, राजेंद्र नगराळे,पोसरे गांवातील अध्यक्ष तसेच विविध गावातील पदाधिकारी उपस्थित होते.या उपक्रमाकरिता सर्च संस्थेचे प्रा.संतोष गांगुर्डे, प्रा.लक्ष्मी साळवी, नेस्ट अध्यक्षा स्वानंदी तांबे, सुवर्णा सेठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.