Voice of Eastern

मुंबई : 

मुंबई महापालिका केईएम, नायर, सायन या तीन प्रमुख रुग्णालयांच्या धर्तीवर भांडुप- नाहूर येथे दहा मजल्यांचे सर्व सुविधांयुक्त रूग्णालय उभारले जाणार आहे. पालिका यासाठी ६७० कोटी रुपये करणार आहे. येत्या ३ वर्षात ३६० बेड्सचे हे रूग्णालय उभे राहणार आहे. त्यामुळे भांडुप, मुलुंड, ठाणे, ऐरोली, कांजूरमार्ग, विक्रोळीपर्यंतच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

भांडुप, मुलुंड, ठाणे, ऐरोली, कांजूरमार्ग ते विक्रोळीपर्यंतच्या रूग्णांना जवळपास मोठे रुग्णालय नसल्याने त्यांना केईएम, सायन, नायर येथे उपचारासाठी यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन येथे दहा मजली रुग्णालय उभारण्य़ाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पालिकेने अंदाजित केलेल्या खर्चाच्या २७ टक्के अधिक रक्कम आहे. मात्र गेल्या तीन वर्षात बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता कंत्राटदाराने खर्चात २७ टक्के वाढ मागितली आहे. त्यामुळे या रूग्णालय उभारणीचा खर्च ६७० कोटींवर जाणार आहे. सदर रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा, एसी, मॉड्युलर ओटी सिस्टीम, मेडिकल गॅस सिस्टीम, न्यूमॅटिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम, यांत्रिकी, विद्युत कामे करण्यात येणार आहेत.

Related posts

आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नाने मिठी नदी शेजारील झोपडीधारकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप

आरोग्यदायी दिवाळीसाठी एफडीएने उचलले हे पाऊल

बदलत्या तंत्रज्ञानानुसार राज्याचे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर

Voice of Eastern

Leave a Comment