Voice of Eastern
ताज्या बातम्या

घाटकोपर पूर्व मध्ये आधार कार्ड आणि सुकन्या समृद्धी योजना शिबिर

banner

घाटकोपर

राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या वतीने घाटकोपर पूर्व मध्ये आधार कार्ड आणि मुलींच्या उच्च शिक्षणासाठी लग्नासाठी व उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या शिबिराचे आज माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

आज दि 25 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान विभागातील नागरिकांना या शिबिर व योजनेचा लाभ घेता येणार आहे. यावेळी नागरिकांना नवीन आधार कार्ड निशुल्क मिळवून देण्याचे व शासकीय दरात आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करून देण्याचे कार्य या शिबिरा दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा कार्यकर्ते किसन थोरात यांनी दिली. या शिबिराला रमेश मोरबिया , भावेश भानुशाली , पियुष दास , चेतन पुरंदरे , सचिन मानकर , युवराज खैरनार , भरत पारेख , शैलेश जोशी , संजय सिंह तसेच भाजपा घाटकोपर पूर्व मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते

आधार कार्ड आणि सुकन्या समृद्धी योजना शिबिराचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते शिबिराला सुरुवात करण्यात आली.

Related posts

वाढत्या वायू प्रदूषणामुळे शरीरात इन्सुलिन बनण्याची प्रक्रिया मंदावली; मुंबई, ठाण्यातील मधुमेही रुग्ण संकटात

आईकडून बाळाला हिपॅटायटीसच्या संक्रमणाचा धोका; डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा

Voice of Eastern

रॉकस्टार डीएसपी आणि अजय देवगण पुन्हा दिसणार थ्रिलरपटामध्ये

Leave a Comment