मुंबई
आम आदमी पक्षाने आज महापौर किशोरी पेडणेकर यांना सुवर्णपदके जाहीर केली. परंतु, कारण जाणाल तर तुम्ही थक्क व्हाल. मुंबईच्या प्रथम नागरिक या अभूतपूर्व कार्यासाठी – शहराच्या नागरी पायाभूत सुविधांचा नाश आणि नागरिकांचे जीवन पूर्वीपेक्षा अधिक दयनीय बनविल्याबद्दल आपने महापौरांना सुवर्ण पदके जाहीर केली. #GoldMedalForMayor नावाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, आप मुंबई वॉर्ड अध्यक्षांनी उपनगरात ‘महापौरांसाठी सुवर्णपदक’ या मथळ्यासह स्टिकर्स लावले, ज्यात आमचे महापौर आणि शिवसेना, अक्षम, बेजबाबदार, आणि आपल्या शहराला त्रास देणार्या नागरी समस्यांकडे लक्ष देण्यास तयार किती यशस्वी झाले आहेत यांचा लेखाजोखा तयार करण्यात आला आहे.
आपच्या मुंबई मोहिमेने दैनंदिन जीवनाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम करणाऱ्या नागरी समस्या समोर ठेवल्या. अगणित खड्डे, अत्याधिक पाइपलाइन लिकेज, उघडे मॅनहोल्स आणि नाले, विखुरलेला कचरा, तुटलेले फूटपाथ, रस्त्यांवरील जीर्ण वाहने, आणि बरेच काही यांचा यात समावेश आहे.
“गेल्या ३० वर्षांपासून बीएमसीमध्ये सत्तेत असूनही, शिवसेना मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्त्यांचे जाळे, ड्रेनेज पायाभूत सुविधा आणि घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था सुधारण्यात असमर्थ ठरली आहे; आणि अत्यावश्यक सार्वजनिक सेवांच्या तरतूदीकडे डोळेझाक केली आहे. जसे की आरोग्यसेवा आणि शिक्षण. भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असूनही – वार्षिक अंदाजपत्रक ३९,००० कोटींहून अधिक असूनही, बीएमसी शहराच्या पायाभूत सुविधांकडे मूकपणे पाहत आहे. या सगळ्यांमुळे मुंबईकरांना त्यांनीच निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या नाकर्तेपणा आणि बेफिकीरपणामुळे संघर्ष करावा लागत आहे” असे वक्तव्य आप मुंबईचे नेते गोपाल झवेरी यांनी केले.
“बीएमसी मधला भ्रष्टाचार आजवरच्या उच्चांकावर आहे, आणि कामगिरी सर्वकालीन खालच्या पातळीवर आहे. मुंबईच्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या महापौर म्हणून किशोरी पेडणेकर सुवर्णपदकाच्या पात्र आहेत. गेल्या 30 वर्षांपासून आपण नागरिक म्हणून सर्वजण ज्या अक्षमतेचे आणि उदासीनतेचे साक्षीदार आहोत ते लक्षात घेऊन नागरिकांनी आपले प्रतिनिधी निवडावेत, असे आमचे आवाहन आहे.” असं वक्तव्य प्रीती शर्मा मेनन, आप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई प्रभारी यांनी केले.