Voice of Eastern

मुंबई :

एफडीएकडून १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान व्यावसायिकांकडील परवाना तपासण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहीमेदरम्यान जे अन्न व्यावसायिक विना परवाना किंवा विनानोंदणी अन्न व्यावसाय करताना आढळून आल्यास त्यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) देण्यात आला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी परवाना किंवा नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी त्याचे तत्काळ नुतनीकरण करण्यात यावे, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.

अन्न व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमांतर्गत परवाना किंवा नोंदणी करूनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. ज्या व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना परवाना घेणे, तर ज्या व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनी नोेंदणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र जे विनापरवाना किंवा विनानोंदणी व्यवसाय करताना आढळून येतील त्यांच्याविरोधात न्यायालयीन खटला दाखल करण्याची तसेच पाच लाखांपर्यंत द्रव्य दंड व सहा महिने कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे अन्न व्यावसायिकांनी परवान्यांची किंवा नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तत्काळ नुतनीकरण करून घ्यावे. तसेच जे अन्न व्यावसायिक परवाना घेण्यासाठी पात्र आहेत, परंतु नोंदणी केलेली अशा व्यावसायिकांनी त्वरित परवाना घ्यावा, अशा सूचना एफडीएकडून मुंबईतीाल अन्न व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. अन्न व्यावसायिकांकडील परवाना व नोंदणी तपासण्यासाठी एफडीएकडून १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली आहे, या मोहीमेला व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही एफडीएचे सह आयुक्त (अन्न) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

कसा कराल अर्ज

ऑनलाईन परवाना किंवा नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यात अर्ज व शुल्क भरावे. संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे आणि तत्सम बाबींसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. अर्ज करताना अडचणी आल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

राज्य सरकारकडे एसीबी तपासासाठी ३६४ प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित

भाजप नगरसेवकांमध्ये प्रभाग रचनेवरून राडा

Voice of Eastern

नियम डावलून प्र-कुलगुरूंनी दिला नेपाळमधील विद्यार्थिनीला प्रवेश

Leave a Comment