मुंबई :
कोरोनाच्या संसर्गाची अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांना अलिकडेच लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बॉलिवूड कोविडच्या रडारवर आले आहे. अभिनेत्री करिना कपूर व अमृता अरोरा या दोघींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना बाधित अभिनेत्री करिना कपूर व अमृता अरोरा या दोघींनाही रुग्णालयात दाखल न करता त्यांच्या घरीच ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. मात्र त्या दोघींची घरे बाहेरून सील करण्यात आली आहेत. त्या घरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई करण्यात आले आहे. तसेच करीना कपूर व अमृता अरोरा यांच्या संपर्कातील अंदाजे ३० जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्याचा वैद्यकीय अहवाल पुढील २४ तासांत येणार आहे. मात्र ज्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटीव्ह येईल त्यांची पुन्हा ७ दिवसानंतर चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
अभिनेत्री करीना कपूर व अमृता अरोरा या गेल्या काही दिवसांपासून एकत्रितपणे पार्टीला जात असत, फिरत होत्या. या दोघीनी कोविड चाचणी केली असता त्यात त्या कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.