मुंबई :
अदिती राव हैदरी तिच्या अभिजात फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. ज्युबिली फेम अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी एक खास गोष्ट केली आहे. लाल रंगाच्या को-ऑर्डरमध्ये तिच्या मनमोहक अदा बघून तिचे फॅन्स खुश झाले आहेत. कॅमेर्यासाठी विविध पोझ देत ईथरीयल सौंदर्याने प्रेक्षकांची मन जिंकते.
तिने फॅशन आयकॉन म्हणून तिचं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या व्यावसायिक कारकिर्दीत आदिती राव हैदरी सध्या अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट करणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर पदार्पण करणारी प्रतिष्ठित चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ती मॅग्ना ऑपस हीरामंडीचा एक भाग होणार आहे तर आदिती विजय सेतुपतीसोबत गांधी टॉक्स नावाच्या मूक चित्रपटातही काम करत आहे. तिची आतुरतेने वाट पाहत असलेला हॉलीवूडचा पदार्पण होणार असल्याचं कळतंय.