Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

मुलुंड कॉलनीतील टँकर माफियांवर प्रशासनाने कारवाई करावी : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

banner

मुंबई :

महापालिकेने स्थानिक पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा तसेच नागरिकांकडून लुट करणा-या पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर माफियांवर तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिल्या.

एल(पश्चिम) येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक,आमदार मिहीर कोटेचा सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलुंड कॉलनी येथील रेणुका हिरवळ यांनी पाण्याचे टँकर पुरवठा करणारे नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेवून जास्त पैसे आकारतात अशी तक्रार केली होती त्याला उत्तर देताना लोढा म्हणाले, स्थानिक लोकांची पाण्याची समस्या पालिकेने तातडीने सोडवावी तसेच पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या यंत्रणेने शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाणी टँकर पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी. निर्वासित वसाहत येथील श्री मारूती कदम यांना घर दुरूस्ती नाहरकत दाखला देण्यात यावी अशा सूचना प्रशासनाला मंत्री लोढा यांनी दिल्या. तसेच मुलुंड पूर्व नवघर येथील संकल्प गृहनिर्माण संस्था पुर्नबांधणीबाबत विकासकांकडून गेली १५ वर्षे हे काम पूर्ण न केल्याबाबत तसेच नागरिकांच्या फसवणुकची चौकशी करण्यात येईल, संकल्प गृहनिर्माण संस्था पुर्नबांधणीबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तक्रारदारांना आश्वासित केले.

पाणी वेळेत न येणे, नादुरूस्त स्ट्रीट लाईट दुरूस्त करून मिळाव्यात यासह ३४८ विविध विषयांवर नागरिकांनी आपल्या तक्रार अर्ज दिले. तर ७८ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम १४ ऑक्टोबरला एम ईस्ट वॉर्ड गोंवडी पूर्व येथे होणार आहे. नियोजित रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.

Related posts

आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला प्रथम विजेतेपद

मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार – मुनगंटीवार

ठाण्यामध्ये भरली कोकणमधील अस्सल हापूस आंब्यांची बाजारपेठ

Leave a Comment