Voice of Eastern

मुंबई :

वैद्यकीय पदव्युत्तर (नीट पीजी) व दंत पदव्युत्तर (नीट एमडीएस) अभ्यासक्रमाच्या राज्यस्तरीय कोटा प्रवेशासाठी उमेदवारांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. ही नोंदणी प्रक्रिया २६ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या अभ्यासक्रमाची माहितीपुस्तिका व सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या सेवा-कार्यातील उमेदवारांनीही नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे. हे उमेदवार इन-सर्व्हिस कोट्याच्या जागेसाठी पात्र असतील. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये पीडब्लूडी (दिव्यांग) उमेदवार म्हणून अर्ज केला आहे. अशानी नोंदणीच्यावेळी अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज वेळेत भरणे आवश्यक आहे. मुदतीच्या अखेरपर्यंत अर्ज भरण्याची वाट पाहू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाईन नोंदणी – २६ सप्टेंबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • नोंदणी शुल्क भरणे – २६ सप्टेंबरपर्यंत
  • सर्वसाधारण गुणवत्ता यादी – २७ सप्टेंबर, सायंकाळी ५ वाजता
  • प्रोव्हिजनल राज्य गुणवत्ता यादी – २८ सप्टेंबर, सायंकाळी ५ वाजता
  • प्राधान्यक्रम देणे, ऑप्शनफॉर्म भरणे – २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर
  • पहिली निवड यादी – ३ ऑक्टोबर, रात्री ८ नंतर
  • मूळ कागदपत्रे आणि शुल्क भरणे – ४ ते ८ ऑक्टोबर, सायंकाळी ५.३० पर्यंत

Related posts

मुंबई विद्यापीठात टाकाऊ वस्तूंपासून तयार झाली कार्यशाळा

Voice of Eastern

आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका

वास्तववादी भूमिकेत प्रथमेश परब

Voice of Eastern

Leave a Comment