Voice of Eastern

मुंबई : 

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांनी सीईटी सेलकडे नोंदणी केली आहे. मात्र नोंदणी झालेल्यापैकी १० महाविद्यालयांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अद्याप मान्यताच मिळाली नाही. त्यामुळे या महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये एकही प्रवेश होऊ न शकल्याने ६७० जागा रिक्त राहिल्या आहेत.

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबवण्यात येते. ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सीईटी सेलकडे नोंदणी करावी लागते. त्यानुसार राज्यातील पूर्वीची ५५ आणि राज्य सरकारची नव्याने मान्यता मिळालेल्या १० महाविद्यालयांनी सीईटी सेलकडे नोंदणी केली होती. मात्र वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयात प्रवेश देण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयालाला नवी दिल्लीतील सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची तसेच महाराष्ट्र सरकारची आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या तिन्ही संस्थांची परवानगी असणे आवश्यक असते. त्यामुळे जेव्हा सीईटी सेलकडून जागांचा तपशिल दाखवण्यात येतो. त्यावेळी ज्या महाविद्यालयांना सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची तसेच महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळाली आहे. त्या महाविद्यालयांची नावे यादीमध्ये दाखवण्यात येतात. परंतु विद्यापीठाची मान्यता मिळाल्याशिवाय महाविद्यालयात विद्यार्थी निवड केली जात नाही. परिणामी यंदा राज्य सरकारने मान्यता दिलेल्या १० महाविद्यालयांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मान्यता मिळाली नसल्याने या महाविद्यालयांमधील प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये या १० महाविद्यालयांमधील ६७० जागांवर एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आलेला नाही. या महाविद्यालयांना लवकरात लवकरत विद्यापीठाची मान्यता मिळाल्यास पुढील फेर्‍यांमध्या या महाविद्यालयातील जागा भरण्यात येतील, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

Related posts

कॉम्युटर आणि मोबाईलच्या अतिवापराने तरुणांना सतावतेय मणक्याच्या समस्या

लैंगिक शक्तीवर्धक, सुडौल बांध्यावरील औषधांच्या विक्रीमुळे रिलायन्स रिटेलवर छापासत्र

मुंबई महापालिकेच्या आयुर्वेदिक दवाखान्यांना नागरिकांचा प्रतिसाद

Leave a Comment