Voice of Eastern

मुंबई : 

कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना नियमित शाळेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेला १ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या प्राथमिक स्तर इयत्ता ५ वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता ८ वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेशाचे अर्ज १ ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी ३ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान आपला मूळ अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे आवश्यक आहे. तसेच शाळांकडे आलेले अर्ज त्यांनी ७ मार्च २०२२ पर्यंत राज्य मंडळाकडे जमा करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.

Related posts

महाडमधील बिनविरोध ३२ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा दावा

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा पारंपरिक पद्धतीने होणार

Leave a Comment