- घाटकोपर :
राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रक्रियेत राज्यभर सर्रासपणे मॉल व दारूचे दुकाने सुरू आहेत मात्र मंदिरांना अद्यापही टाळेच लावले आहेत. सरकारची ही भूमिका धर्मविरोधी असल्याची टीका सर्व स्थरातून होत असताना मंदिर उघडण्याच्या भूमिकेवर भाजपनंतर आता मनसेही रस्त्यावर उतरली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मंदिरा बाहेर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिल्या नंतर मनसे कार्यकर्त्यानी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. घाटकोपर पूर्व मनसे विभाग अध्यक्ष संदीप कुलथे यांच्या नेतृत्वाखाली पंतनगर येथील तीन मंदिर नाका या मंदिरा बाहेर घंटानाद करत मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यानी मंदिरा बाहेर गणेश आरती केली. पंतनगर पोलिसांनी यावेळी विभाग अध्यक्ष संदीप कुलथे यांच्यासह उपविभाग अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी , महिला विभाग अध्यक्ष कविता राणे , शाखाध्यक्ष राजेश जाधव , कुणाल केदारे आदींना पंतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सरकारने लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणत मदिराची दुकाने सुरू केली मग मंदिर सुरू करण्यात काय अडचण आहे. मंदिर सुरू केल्याने कोरोना वाढतो का ? हे सरकार हिंदुधर्म विरोधी आहे का?
– संदीप कुलथे, विभाग अध्यक्ष, घाटकोपर पूर्व