Voice of Eastern

मुंबई : 

शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत सर्वांच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी निर्णायक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. या नेमणुकांमध्ये विद्यमान मंत्र्यांचाही समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत विभागीय संपर्क नेते आणि जिल्हानिहाय लोकसभा निरीक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीमधील तीनही प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्षांमध्ये समन्वय राखून महायुतीचा उमेदवार निवडुन आणण्याची रणनिती आखली जाणार आहे. पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर “मिशन २०२४” च्या दृष्टीने महायुतीची ही आक्रमक रणनिती समजली जात आहे.

विभागीय संपर्क नेत्यांची नेमणूक करताना कोकण विभागाच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच मुंबई शहर व उपनगरसाठी सिद्धेश कदम व किरण पावसकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, हिंगोली व धाराशिव जिल्ह्यांसाठी आनंदराव जाधव यांची तर जालना, संभाजीनगर, परभणी व बीड जिल्ह्यांसाठी अर्जुन खोतकर आणि उत्तर महाराष्ट्रात मोडणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यांसाठी भाऊसाहेब चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी विभागीय संपर्क नेते म्हणून विजय शिवतारे व पुणे सोलापूर जिल्ह्यांसाठी संजय मशीलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी दीपक सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांसाठी विलास पारकर आणि वाशीम, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांसाठी विलास चावरी यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय लोकसभा निरीक्षकांची नेमणूक : 

नंदुरबार जिल्ह्यासाठी राजेश पाटील, धुळे जिल्ह्यासाठी प्रसाद ढोमसे, जळगाव जिल्ह्यासाठी सुनील चौधरी, रावेर जिल्ह्यासाठी विजय देशमुख, बुलढाणा जिल्ह्यासाठी अशोक शिंदे, अकोला जिल्ह्यासाठी भूपेंद्र कवळी, अमरावतीसाठी  मनोज हिरवे, वर्धा जिल्ह्यासाठी परमेश्वर कदम, रामटेक जिल्ह्यासाठी अरुण जगताप, नागपूरसाठी अनिल पडवळ, भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी आशिष देसाई, गडचिरोली-चिमूर जिल्ह्यासाठी मंगेश काशीकर, चंद्रपूरसाठी किरण लांडगे, यवतमाळ-वाशिम जिल्ह्यासाठी गोपीकिशन बजौरीया, हिंगोली जिल्ह्यासाठी सुभाष सावंत, नांदेड जिल्ह्यासाठी दिलीप शिंदे, परभणी जिल्ह्यासाठी सुभाष साळुंखे, जालना जिल्ह्यासाठी विष्णू सावंत, छत्रपती संभाजीनगरसाठी अमित गिते, दिंडोरी जिल्ह्यासाठी सुनील पाटील, नाशिकसाठी जयंत साठे, पालघर जिल्ह्यासाठी रवींद्र फाटक, भिवंडीसाठी प्रकाश पाटील, रायगडसाठी मंगेश सातमकर, मावळसाठी विश्वनाथ राणे, पुणे जिल्ह्यासाठी किशोर भोसले, शिरूरसाठी अशोक पाटील, नगर जिल्ह्यासाठी अभिजित कदम, शिर्डीसाठी राजेंद्र चौधरी, बीड जिल्ह्यासाठी डॉ. विजय पाटील, धाराशिव जिल्ह्यासाठी रवींद्र गायकवाड, लातूर जिल्ह्यासाठी बालाजी काकडे, सोलापूर जिल्ह्यासाठी इरफान सय्यद, माढा जिल्ह्यासाठी कृष्णा हेगडे, सांगली जिल्ह्यासाठी राजेश क्षीरसागर, सातारा जिल्ह्यासाठी शरद कणसे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी राजेंद्र फाटक, कोल्हापूरसाठी उदय सामंत, तर हातकणंगले जिल्ह्यासाठी योगेश जानकर यांची निवड करण्यात आली आहे.

Related posts

एका महिन्यात ५० लाखांची वीजचोरी

Voice of Eastern

मुंबई महापालिका खासगी शाळातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

नांदेड पनवेल एक्स्प्रेसचा चिपळूणपर्यंत विस्तार करण्याची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कोकणवासीयांची मागणी 

Voice of Eastern

Leave a Comment