Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

क्षयरोगविरोधी लढ्यात अहमदनगरची सुवर्ण कामगिरी; महाराष्ट्राला एक सुवर्ण तर दोन कांस्यपदक

banner

नवी दिल्ली : 

क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घट घडवून आणल्याबद्दल महाराष्ट्राला एक सुवर्ण तर दोन कांस्यपदकाने गौरवण्यात आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे अहमदनगर जिल्ह्याला सुवर्ण पदक तर अकोला, बीड जिल्हयांना कांस्यपदकाने गौरवण्यात आले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित “स्टेप अप टू एन्ड टीबी २०२२” शिखर परिषदेत क्षयरोग रुग्णांमध्ये घट आणणाऱ्या राज्य व जिल्ह्यांना गौरवण्यात आले. जिल्हा श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, अकोला आणि बीड या तीन जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले. २०१५ च्या तुलनेत वर्ष २०२१ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये ६० टक्के पेक्षा जास्त घट घडवणाऱ्या अहमदनगरला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया, राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहीफळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सुवर्ण पदक, ५ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

त्याचप्रमाणे अकोला आणि बीड या जिल्ह्यांना २०१५ च्या तुलनेत २०२१ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये २० टक्के पेक्षा जास्त घट घडवल्याबद्दल कांस्यपदकाने गौरविण्यात आले. बीड जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव आणि अकोल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हरी पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पदक, २ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Related posts

महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात सामंजस्य करार

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा – राजेश टोपे

त्रस्त झाले टेलिव्हिजन अभिनेता अलन कपूर! का ते जाणून घ्या!

Leave a Comment