Voice of Eastern

नवी दिल्ली : 

प्रत्येक वाहनांमध्ये चालकाच्या सुरक्षेसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एअरबॅग अनिवार्य केली होती. त्यापाठोपाठ आता पुढील बाजूस चालकाच्या जवळ बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅग अनिवार्य करण्यात आली आहे.

वाहन उद्योग मानके (Automotive Industry Standard -AIS) १४५ या नियमानुसार १ एप्रिल २०२१ आणि त्यानंतर उत्पादित होणाऱ्या नवीन वाहनांना आणि सध्या अस्तित्वात असलेल्या वाहनांपैकी ३१ ऑगस्ट २०२१ नंतर तयार झालेल्या वाहनांना हा नियम बंधनकारक केला आहे. मात्र, कोरोनाचा कालखंड लक्षात घेऊन २६ ऑगस्ट २०२१ रोजीच्या सर्वसाधारण वैधानिक नियम (जीएसआर) 595 (ई) अन्वये अस्तित्वात असलेल्या वाहनांना एअरबॅग बसवण्यासाठीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली होती.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १४ जानेवारी २०२२ रोजी काढलेल्या सर्वसाधारण वैधानिक नियम (जीएसआर) १६(ई) नुसार १ ऑक्टोबर २०२२ नंतरच्या एम-१ या प्रकारातील वाहनांना दोन्ही बाजूंनी टोर्सो एअरबॅग्ज लावणे अनिवार्य केले आहे. वाहनांच्या पुढील भागात बसलेल्या प्रवाशांसाठी प्रत्येकी एक एअरबॅग लावणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेत भर टाकण्याच्या हेतून हा नियम केला आहे. समोरासमोरील धडकेमध्ये बाजूच्या/टोर्सो एअरबॅग्ज या वाहन आणि त्यामधील प्रवासी यांच्यामध्ये गादीसारखे काम करते. आघाताचा परिणाम गाडीत बसलेल्या प्रवाशांवर होऊ देत नाही. एअरबॅगची किंमत ही वाहनातील जागा आणि वाहनाचा प्रकार यानुसार ठरवावी. तरीही दोन बाजूच्या आणि २ कर्टन एअरबॅग्जची किंमत ५६०० ते ७००० रुपयांपर्यंत असावी. या नियमावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत, त्यानंतर विचार करून या नियमाला अंतिम रुप मिळेल.

Related posts

फुले, आंबेडकर यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी कष्ट उपसले – चंद्रकांत पाटील

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्याची जी टी रूग्णालयात नागरिकांना संधी; देशातील तज्ज्ञ डॉक्टर करणार शस्त्रक्रिया

सिनेमहोत्सवांमध्ये गाजलेला ‘अन्य’ १० जूनला होणार प्रदर्शित

Leave a Comment