Voice of Eastern

मुंबई :

आजवर आपल्या संगीतासोबतच जादुई आवाजाने संगीतप्रेमींचे कान तृप्त करणारे पार्श्वगायक अजय गोगावले यांच्या आवाजाचा काहीसा नवा ढंग लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘गुल्हर’ या आगामी मराठी चित्रपटासाठी अजयने एक सुरेख गाणे गायले आहे. हे गाणं संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारं ठरणार आहे. या चित्रपटाने नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये बेस्ट ज्युरी मेन्शन अॅवॉर्ड, साऊथ इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये बेस्ट फिल्म, मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ज्युरी अॅवॉर्ड हे पुरस्कार पटकावले असून बर्लिन लाईफ ऑफ फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये या चित्रपटाचे ऑफिशियल सिलेक्शन झाले आहे.

शांताराम (आप्पा) मेदगे, अनुप शिंदे, अबिद सय्यद आणि शिवाजी भिंताडे यांनी आयडियल व्हेंचर आणि आर. के. फिल्मच्या बॅनरखाली ‘गुल्हर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘बाबो’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या रमेश चौधरी यांनी ‘गुल्हर’चं दिग्दर्शन केलं आहे. गीतकार वैभव कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘लहर आली, लहर आली गं…’ हे टायटल साँग महत्त्वाचे ठरले आहे. या गाण्याला अजय गोगावले आणि अपूर्वा निषाद यांच्या आवाजाची साथ लाभली आहे.  संगीतकार पद्मनाथ गायकवाड यांनी स्वरसाज चढवला आहे. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॅार्डिंग झालं आहे. ‘गुल्हर’ हे या चित्रपटाचं शीर्षक अनाहुतपणे कोणाचंही लक्ष वेधून घेणारं असून, त्याला साजेसं असलेलं ‘लहर आली, लहर आली गं…’ हे गाणं संगीतप्रेमींना एक वेगळीच अनुभूती देणारं असल्याचं अजय गोगावले यांनी सांगितले.

Related posts

रायगडमध्ये १२९४ देवींचे होणार आगमन

या दिवशी मुंबईमध्ये होणार पाणी कपात; काय आहे कारण जाणून घ्या.

Voice of Eastern

मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतील गळती, दूषित स्रोत शोधणार अत्याधुनिक क्राऊलर कॅमेरा

Leave a Comment