Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमी

अक्षय शेटेचा वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया केला गौरव, 120 शिर्षासनाचा केला होता रेकॉर्ड

banner

घाटकोपर

योग हे प्राचीन भारतीय कलेचे प्रतिक मानले गेले आहे. संपूर्ण जगाला योग हा भारताने दिलेला वारसा आहे. आयुष्यात सकारात्मक कथा व ऊर्जा टिकवण्यासाठी योगाचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. अक्षय शरद शेटे या 28 वर्षीय युवकाने घाटकोपर मुंबई हॉटेल विंड साकीविहार रोड पवई येथे एका मिनिटांमध्ये 120 शीर्षासनाचे क्रंचेस करून एक नवा विश्वविक्रम स्थापन केला आहे.

ह्या आधीचे शिर्षासनाचे रेकॉर्ड मोडीत काढून नवा विश्वविक्रम स्थापन करणारा अक्षय शेटे हा भारतातला पहिला युवक ठरला आहे. आयटी क्षेत्रात इंजिनियर असलेल्या या तरुणाने या विश्वविक्रमाद्वारे सध्याच्या तरुण पिढीपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे म्हणूनच त्याच्या या रेकॉर्डची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेऊन ह्या संस्थेचे सीनियर एज्युकेटर सुषमा संजय नार्वेकर व संजय विलास नार्वेकर यांनी अक्षय चा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी साकिनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख , मराठा क्रांती मोर्चाचे व्यासदेव पवार , लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष राजूशेठ पाखरे , लॅपविंग ग्रुप चे अध्यक्ष विनोद जाधव , हॉटेल विंडचे मालक राजन आदी उपस्थित होते.

 

Related posts

‘डार्लिंग’चं नवं गाणं ‘मनाचं पाखरू…’ रसिकांच्या भेटीला

Voice of Eastern

चाळिशीतील बाबांच्या हृदयाची धडकन वाढतेय!

देशात शालेय शिक्षणात महाराष्ट्र तर राज्यात सातारा जिल्ह्याची मुसंडी

Leave a Comment