पुष्पा द राईस हा चित्रपट दिवसेंदिवस वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करत आहे. या चित्रपटामुळे दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आहे की अल्लू अर्जुनला थेट १५ मिलियन स्टार बनवले आहे. इंस्टाग्राम वर त्याचे १५ मिलियन फॉलोवर्स झाले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम वर फॉलोवर्स असणारा अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पहिलाच सुपरस्टार ठरला आहे.
अल्लू अर्जुन सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. हा टप्पा घातल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया बरच आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांनी चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ही दिले आहेत. त्याच्या पुष्पा चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. मुळ तेलुगू भाषेतील हा चित्रपट कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदी भाषेतही प्रसिद्ध झाला आहे.