मुंबई :
अल्लू अर्जुनचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा द राईझ’ या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत, तसेच अजूनही काही विक्रम मोडण्याच्या तयारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक अशी घटना घडली की ज्याच्यामुळे अल्लू अर्जुन हा एक खरोखरच आयकॉनिक स्टार असल्याचं सिद्ध झाले आहे. आपली भूमिका अधिक सक्षम, उठावदार आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडावी, यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी जीवतोड मेहनत केली आहे. यामध्ये आमीर खान, अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, अक्षय कुमार यासारख्या अनेकांची नावे प्रामुख्याने समोर येतात. या पंक्तीत आता अल्लू अर्जुनचेही नाव जोडले गेले आहे. ‘पुष्पा द राईझ’मधील ‘अयय बिद्दा’ हे गाणे सध्या बरेच चर्चेत आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का हे गाणे चित्रित करण्यासाठी अल्लू अर्जुनने तब्बल १२ तास दिले आहेत. गाण्याचे चित्रीकरणला दुपारी दोन वाजता सुरू झाली. ते दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजेपर्यंत चालू होते, असे तब्बल १२ तास गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. गाण्यांमध्ये विविधता दिसून यावी यासाठी अल्लू अर्जुनने तब्बल २४ वेळा कपडे बदललेले आहेत. अल्लू अर्जुनने घेतलेल्या या कष्टामुळे तो आयकॉनिक स्टार ठरत आहे.