Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

रुपारेल महाविद्यालयासाठी धावून आले माजी विद्यार्थी; बंद विभाग पुन्हा सुरू होणार

banner

मुंबई :

माटुंगामधील रुपारेल महाविद्यालयातील विज्ञान इमारत, वसतिगृह, उपहारगृह, जिमखाना अशा अनेक सुविधा प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या होत्या. उपहारगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांना उद्यानात बसून जेवण करावे लागत असे, अशा अनेक गैरसोयींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी धावून आले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत संस्था तसेच व्यवस्थापनाशी चर्चा केली. माजी विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन प्राचार्य, संस्था पदाधिकारी आणि व्यवस्थापनाने महाविद्यालयातील बंद असलेले विभाग पुन्हा सुरू केले जातील, असे आश्वासन दिले.

रुपारेल महाविद्यालयातील अनेक सुविधा वर्षभरापासून बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये विज्ञान इमारत, जिमखाना, उपहारगृह, वसतिगृह अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. महाविद्यालय सुरू होऊन महिने उलटले तरी या सुविधा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. अनेक इमारतींना लिफ्ट असूनही त्या बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची गैरसोय होत आहे. यासंदर्भातील अडचणी व्यवस्थापनाकडून डॉ.ऐ.जे हाके व प्राचार्य डॉ.दिलीप म्हस्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी व आजी आणि माजी विद्यार्थी यांच्या शिष्टमंडळाने मांडल्या.

विज्ञान इमारत, जिमखाना, उपहारगृह, वसतिगृह इमारतमधील बंद असलेल्या लिफ्ट तातडीने सुरु केल्या जातील असे आश्वासन महाविद्यालय प्रशासनाने दिले. भविष्यातील शैक्षणिक धोरण लक्षात घेऊन सुसज्ज महाविद्यालय उभारण्याबाबतची योजना आखून पुन्हा १५ दिवसांत शिष्टमंडळाबरोबर बैठक घेण्यात येईल. बंद असलेले उपहारगृह, वसतिगृह, बंद असलेली लिफ्ट लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच माजी विद्यार्थी संघ स्थापन करून त्यांचे प्रश्न विचारात घेण्याचे आश्वासनही शिष्टमंळाला देण्यात आले. यावेळी झालेल्या बैठीकीत शिष्टमंडळातील माजी विद्यार्थी व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी, प्रसाद शिवलकर, मिलिंद भोसले, अमित गणफुले, सचिन धुमाळ, संतोष दर्णे, योगेंद्र तोडकरी, वैभव किणी, भरत माने, संदीप पवार, गणेश पानसरे, जयेश देसाई व अनेक आजी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

मुंबईला सामना करावा लागणार पाणी कपातीच्या संकटाचा

Voice of Eastern

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा,भव्य-दिव्य व्हावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निवडणुकीमुळे पूर्व उपनगरात ५४७ कोटींची रस्त्यांची कामे

Voice of Eastern

Leave a Comment