मुंबई
एमआयएम पक्षाच्या वतीने आज मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मोठ्या विरोधानंतर देखील काल चांदीवली येथे सभा रॅली पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबई जवळ तिरंगा रॅली पोहचल्यावर पोलिसांनी दिलेल्या वागणुकीने चुकीची होती. दहशतवादी आहोत का असा प्रश्न पडल्याचं मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं. तसेच पोलिसांनी मुंबईला जाण्यासाठी गाड्यांवरील तिरंगा झेंडा काढण्यास सांगितल्याचा आरोप जलील यांनी केला.
तिरंगा रॅली वाशीजवळ पोचल्यानंतर या रॅलीमध्ये आम्ही तिरंगा झेंडाचा वापर केला होता. आम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा लावून आलो नव्हतो.आम्ही हिरवा, निळा, भगवा, पिवळा झेंडा लावला नव्हता. आम्ही या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा गाडीला लावून ही तिरंगा रॅली मुंबईला घेऊन आलो.
या तिरंग्यावर आम्हाला अभिमान आहे. तिथं इतका पोलीस फौजफाटा होता की मला शंका आली मी खासदार आहे की कोणी दहशतवादी आहे.वाशीजवळ काही पोलिसांनी आम्हाला गाड्यांचे तिरंगा ध्वज काढण्यास सांगितले, तरच पुढे जाऊ देऊ असा आदेश देण्यात आला. हे आदेश वाशीच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिले. त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी देखील तेथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर मुंबईला जायचं असेल तर गाडीचा तिरंगा काढा असं सांगण्यात आलं, ” असा आरोप जलील यांनी पोलिसांवर केला.