ठाणे :
राज्याच्या राजकारणात ठाणे हेच सध्याच्या घडीला केंद्रबिंदु ठरत आहे. त्यातच, महाराष्ट्रात नाहीतर देशभरात दिवंगत आनंद दिघेंची देवी म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या टेंभीनाक्यावरील आंबेमातेच्या दर्शनाला शनिवार- रविवारी जणू देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्याने जणू भाविकांचा महासागर लोढल्याचे पाहण्यास मिळाले. देवीची ओढी नाहीतर देवीचे दर्शन किंवा केवळ मुख्यदर्शनाला आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. याशिवाय या परिसराला यंदा मोठ्या प्रमाणात जत्रेचे स्वरूप आल्याने बच्चेकंपनीची तितकीच धम्माल मस्ती पाहण्यास मिळत होती.
राज्यातील सत्तांतरामुळे ठाण्याला विशेष महत्व प्राप्त झाले. ठाण्याच्या सुपुत्राने राज्याच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी करत मुख्यमंत्री पदाची खुर्ची पटकावली. त्यातच दिघेंचे शिष्य आणि त्यांचे प्रतिबिंब म्हणून ओळख असलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघेंच्या निधनानंतर दिघे यांनी सुरू केलेल्या या उत्सवाची परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. त्यातच शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा तसेच कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी सर्व निर्बंध मुक्त हा उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनाला राजकारणातील मंडळीच नाही तर सिनेसृष्टीतील मराठी असो हिंदीतील कलाकार मंडळी हजेरी लावत होती. त्यातच ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद जोरदार सुरू असल्याने त्या गटांकडून मोठ्या प्रमाणात राजकीय शक्तिप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे या नवरात्रोत्सवाला आणखीच महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच शनिवार आणि रविवार ठाणे शहरातीलच नाहीतर जिल्ह्यातून, मुंबई आणि उपनगर येवढेच नाहीतर राज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. दिवसभर नाहीतर रात्रीच्या वेळेसही टेंभीनाक्यावर भाविकांच्या अलोट गर्दीतून जणू गर्दीचा महासागर पसरला आहे असेच दिसत आहे. एकीकडे देवीचे दर्शन होत असताना दुसरीकडे नवरात्रोत्सवात जत्रेचा ही आंनद लुटला जात आहे. खेळापासून खाद्य पदार्थांच्या लावलेल्या स्टॉल्समुळे खवय्यांची चंगळच झाली आहे. तर बच्चेकंपनी खेळण्यात आणि खेळणी विकत घेण्यात दंग होताना दिसत आहे.