Voice of Eastern

मुंबई : 

रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या ‘अ‍ॅनिमल’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या टीझरने इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. या आगामी सिनेमॅटिक चित्रपटात अनिल कपूर अनोख्या भूमिकेत दिसणार आहेत. बलबीर सिंगच्या पात्रात अनिल कपूर दिसणार असून संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित आणि T-Series आणि Cine1 Studios द्वारे निर्मित ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ती दिमरी, शक्ती कपूर आणि इतर अनेक कलाकारांचा खास भूमिका आहेत.

यापूर्वी रिलीज झालेल्या पोस्टर्सने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली असून ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. चाहते पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर त्याची जादू पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या टीझरने चाहत्यांना आश्चर्यचकित केले असून हा एक उत्तम चित्रपट असणार यात शंका नाही. अनिल कपूरच्या AKFCN निर्मित ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाचा अलीकडेच टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला. त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

Related posts

पेपरलेसनंतर आता केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल ॲपवर

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रा. दिगंबर शिर्के यांच्याकडे

अकरावी प्रवेशाला नॉन क्रिमीलेअरची बेडी; पालकांमध्ये संभ्रम

Leave a Comment