Voice of Eastern

मुंबई : 

आनंद एल राय कलर यलो प्रॉडक्शनमागील एक भक्कम चेहरा आहेत. नुकतंच त्यांनी एक नवा चेहरा लाँच केला आहे. कलर यलोने अभिनेता अंश दुग्गलची ओळख इंडस्ट्रीला करून दिली आहे. जो भारतीय चित्रपट उद्योगातील एक रोमांचक चेहरा आहे. आनंद एल राय जे नेहमीच नव्या कलाकारांना प्रोत्साहन देत असतात. त्यांनी अंशची चित्रपट जगताशी ओळख करून दिली आहे. अंश दुग्गल कलर यलो प्रॉडक्शनसह अनेक क्रिएटिव्ह प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

आनंद एल राय म्हणतात, आम्ही नेहमीच नव्या कलाकारांना प्रोत्साहन देत असतो आणि अशातच अंशला लाँच करून त्याला आम्ही आमच्या नव्या प्रोजेक्टमध्ये एक नवीन ओळख देणार आहोत. अंश दुग्गलसारखा नवा चेहरा लाँच करून चित्रपटांसाठी एक नवा कलाकार घेऊन येणं हे अगदीच कौतुकास्पद आहे. ही घोषणा कलर यलो प्रॉडक्शनने केली असून नेहमीच नव्या टॅलेंटला संधी देण्याची अनोखी संधी आहे.

आनंद एल राय यांचे कलर यलो प्रॉडक्शन भारतीय सिनेमाच्या लँडस्केपमध्ये चर्चेत आहे. शुभ मंगल सावधान, तनु वेड्स मनू, रांझणा यांसारख्या चित्रपट त्यांनी केले असून अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट येणाऱ्या काळात रिलीज होणार आहेत. आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनचे अनेक प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये असताना ” तेरे इश्क मे, फिर आयी हसीन दिलरुबा, झिम्मा २, आत्मपॅम्फलेट ” हे उत्कंठावर्धक प्रोजेक्ट येणार आहेत.

Related posts

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत १ हजार ५८४ पदांची भरती

मुंबई महापालिकेकडून मराठी शाळांवर अन्याय; शिक्षकांची २० टक्के पदे कायम रिक्त ठेवणार

Voice of Eastern

Leave a Comment