Voice of Eastern

मुंबई :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये गट ‘क’ साठी घेतलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना १५ दिवसात नियुक्ती देण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘क’ मध्ये २०१९ मध्ये कर सहायक, लिपिक टंकलेखक व दुय्यम निरीक्षक या तीन पदांसाठी पदभरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार्‍या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठराविक कालबध्द वेळेत करण्यासंदर्भात विधानसभा सदस्य डॉ.विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.

भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरिम आदेशान्वये एसईबीसी आरक्षणासह स्थगिती दिली होती, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कर सहायकांची १२६ आणि लिपीक टंकलेखकाच्या १७९ पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना १५ दिवसांत नियुक्ती देण्यात येण्याबाबत तसेच ३३ दुय्यम निरीक्षक मधील १७ जणांना नेमणूक आदेश दिले आहेत. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सर्वांच्या वेळेत नेमणूका करण्यात येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या सहा महिन्यात साधारणत: ३०० परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, असेही सामान्य प्रशासन राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.

Related posts

जे. जे. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचा संताप

Voice of Eastern

शालेय स्तरावर करिअरची पायाभरणी

Voice of Eastern

मत्स्यव्यवसाय विकासासाठी डीपीडीसी’तून मिळणार निधी

Leave a Comment