Voice of Eastern
ताज्या बातम्या मोठी बातमी शहर

संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सदस्यपदी महाडमधील दहिवडच्या सुपुत्राची नियुक्ती

banner

महाड :

संयज गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत पात्र असलेल्या व्यक्तींची पडताळणी करून त्यांचे अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी सरकारने तालुकानिहाय स्थापन केलेल्या समितीवर असते. या समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य हे अशासकीय व सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणारे असतात. त्यानुसार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केलेल्या शिफारशीनुसार महाड तालुक्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठीची समिती गठीत करण्यात आली आहे.

रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे शिफारस केल्यानुसार नुकतीच महाड तालुक्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठीची समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्य करणारे निलेश लक्ष्मण ताठरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाडमधील दहिवड गावातील धडाडीचे कार्यकर्ते तसेच मुंबईतील जे.जे. रुग्णालयामध्ये प्रत्येक रुग्णाच्या मदतीसाठी धावून जाणारे, त्यांच्या उपचारासापासून त्यांच्या नातेवाईकांचे राहणे व जेवणाची व्यवस्था अशी सर्वतोपरी मदत करणारे लक्ष्मण भाऊराव म्हामुणकर यांची तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून सदस्यपदी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गातील देवीदास गायकवाड, महिला प्रतिनिधी दर्शन बारणे, इतर मागासवर्गीय संजय रेशीम, संजय चिखले, सर्वसाधारण प्रवर्गातील आरिफ उभारे, अपंग प्रवर्गातील प्रतिनिधी जितेंद्र नाडकर, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी लक्ष्मण गरूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून एक सरकारी अधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून तहसिलदार किंवा नायब तहसिलदाराची नियुक्ती केल्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

संयज गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी दारिद्य्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजारांपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र होणार्‍या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास ६०० रुपये प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास ९०० रुपये प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.

Related posts

देशी बियाणांपासून बाप्पाची मूर्ती साकारत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Voice of Eastern

उपनगरात महापालिका बसवणार ७५ डायलिसिस मशीन 

Voice of Eastern

नवीन ग्रंथालयाबाबत विद्यापीठाचे तारीख पे तारीख!

Voice of Eastern

Leave a Comment