Voice of Eastern

मुंबई :

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाची ऑनलाईन नोंदणी करून अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात भरलेली माहिती मार्गदर्शक केंद्रावरून प्रमाणित करून घ्यायची आहे.

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सरावासाठी शिक्षण संचालकांकडून २३ ते २७ मेपर्यंत विद्यार्थ्यांना डेमो अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र अनेक विद्यार्थी हे सुट्टीनिमित्त बाहेरगावी असल्याने अवघ्या ४६ हजार विद्यार्थ्यांनी डेमो अर्ज भरले. मात्र आता अकरावी प्रवेशाचे प्रत्यक्ष अर्ज भरण्यास ऑनलाईन पद्धतीने सोमवारपासून सुरुवात होत आहे.

अर्ज भाग १ कसा भराल

  • विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे.
  • लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करून इयत्ता ११ वी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग १ भरायचा आहे.
  • ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करायचा.
  • अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे.
  • मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यायचा आहे.
  • खुल्या प्रवर्गातील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज आपोआप प्रमाणित होतील.

Related posts

मुंबईतील एसारएचे ५१७ प्रकल्प रद्द – जितेंद्र आव्हाड

‘श्यामची आई’च्या गीतांना अशोक पत्कींच्या संगीताचा साज

भोंग्यावरुन वांद्रे, सांताक्रुजमध्ये दोन मशिदींच्या ट्रस्टीविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Comment